पुणे - "पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही. बुधवारी सत्ताधारी पक्षाने महापालिका सभेत सादर केलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या अहवालात त्रुटी आहेत. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तज्ज्ञांची मदत घेऊन दहा दिवसांत मेट्रो प्रकल्पाविषयी स्वतंत्र अहवाल बनविणार आहे. तो अहवाल मुख्यमंत्री व पालिका आयुक्तांना देणार आहे,' असे मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर यांनी "ई सकाळ'शी बोलताना सांगितले.