हर्बेरिअमचं चौथं पान आता लवकरच उलगडणार आहे. शाहीर साबळे लिखित "आंधळं दळतंय' हे नाटक तब्बल 45 वर्षांनी सुबकतर्फे पुन्हा रंगभूमीवर येतंय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी गाजलेल्या या नाटकाचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी दिग्दर्शक केदार शिंदेनं आपल्या खांद्यावर घेतली आहे.