मुंबई - चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी चित्रपट आले आणि गेलेही. काही वेगळ्या विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर, काही चित्रपट साफ आपटले. सध्या तर, सर्वच चित्रपट तिकीट बारीवर कोसळत आहेत. या परिस्थितीतच राजकुमार गुप्ता एक डार्क कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अर्थात डर्टी पिक्चरमधून धीरगंभीर भूमिका करणारी विद्या बालन या चित्रपटात प्रेक्षकांना घनचक्कर करणार आहे. त्यात तिला साथ देणार आहे इमरान हाश्मी. राजकुमार यांनीच विद्याला नो वन किल्ड जेसिकामध्ये सबरिना लालच्या भूमिकेसाठी निवडले होते.
विशेष म्हणजे, इमरानच्या जागी सुरवातीला अभिषेक बच्चन आणि सैफ अली खानच नाव चर्चेत होते. पण, प्लेअर्सच्या अपयशामुळे राजकुमार यांनी त्याला नापसंत केले.