ताडोबातील मटकासूर वाघाने दिले पर्यटकांना दर्शन
चंद्रपूर : व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांची पहिली पसंती ताडोबा मानली जाते. वर्षभर ताडोबा प्रकल्प देशी-विदेशी पर्यटकांनी फुलून जातो. जंगलच्या राजाच्या वेगवेगळ्या छवी आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी पर्यटक तासनतास वाट बघत असतात. रोज काहीतरी नवीन कृती करतानाचे वाघांचे व्हिडिओज वायरल होत असतात. चंद्रपूरचे व्याघ्र प्रेमी हेमंत गुहे यांनी प्रकल्पातील मटकासुर या प्रसिद्ध वाघाला आपल्या कॅमेरात कैद केले. या व्हिडिओमध्ये मटकासुर बराचवेळ पर्यटकांना न्याहाळताना दिसत आहे. नंतर तो जिप्सी समोरून ऐटीत पुढे निघाला. मटकासुराने जवळजवळ एक ते दीड तास पर्यटकांना दर्शन दिले.
#TadobaTigerReserve #Tiger #Chandrapur #Vidarbha #ESakalNews #MarathiNews #Sakal #SakalNews #news #viral #ViralNews #SakalMedia