लॉकडाउनमुळे कोल्हापूर शहरात अडकलेल्या राजस्थान येथील सुमारे 228 पर्यटक,व्यापारी आज तब्बल दोन महिन्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले. आम्ही जाउ शकतो की, नाही?अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने आणि कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने चांगले सहकार्य केल्याने आम्ही आमच्या गावी जात आहोत, कोल्हापूरकरांना व राज्यसरकालाही आमचे धन्यवाद,असे म्हणत आज हे पर्यटक चार मिनी बस आणि कांही खासगी वाहनाने सायंकाळी रवाना झाले.
बातमीदार : डॅनियल काळे
व्हिडिओ : मोहन मेस्त्री