Surprise Me!

कोल्हापूरी खेकड्याची चव लई भारी...!

2021-04-28 1,197 Dailymotion

आंबेवाडी (ता. करवीर), वडणगे येथील फाट्यावर ते अगदी केर्लीपर्यंतच्या रस्त्याबाजूला तुम्हाला खेकडे विकणारी मंडळी दिसतील. जून ते ऑगस्टपर्यंत हा खेकडे विक्रीचा व्यवसाय सुरु असतो. इथे मिळतो तो काळ्या पाठीचा खेकडा. चविला तो अतिउत्कृष्ठ. नदी, तलाव, ओढा, भाताची खाचरे, उसाच्या शेतातही खेकड्याची बिळे असतात. रात्रीच्या वेळी हा खेकडा भक्ष्यासाठी बाहेर पडतो. तेव्हा अनेकजण तो पकडतात. अगदी नदीत जाळे टाकलेले असते. त्या जाळ्यात ही अनेक खेकडे पकडले जातात. बरोबर टॉर्च, पेटलेला टायरही उजेडासाठी घेतात. खेकड्याचा रस्सा सर्दी, खोकला बरा होता, अशी समजूत आहे. हा रस्सा अगदी दिडशेपासून ते 300/350 रुपयांपर्यंत मिळतो. मोठा अन्‌ लहान असे खेकड्यांसाठी वेगवेगळे दर असतात. खूप लोक खेकडा घेण्यासाठी या भागात येतात.

रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ : नितीन जाधव


#sakal #news #viral #sakalnews #marathinews #kolhapur #kolhapurnews #marathinews #sakalmedia