वेलतूर (जि. नागपूर) : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता तिढा सुटता सुटत नाही आहे. शाळा व अभ्यासाविना घरी राहून कंटाळलेल्या बच्चे कंपनीनी आपला मोर्चा आई-वडिलांसह शेताच्या बांधावर वळवीला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. धान रोवणीला वेग आला आहे. पूर्वी मुले शाळेत व पालक बांधावर असे सुत्र होते. मात्र, आजघडीला ते बदलले असून, पालक लेकरांना गावभर हुदंळण्यासाठी घरी ठेवण्यापेक्षा सोबत शेताच्या बांधावर नेणे पसंत करीत आहेत. (व्हिडिओ : शरद शहारे)