Surprise Me!

अमरावतीतील रस्ता अपुरा मात्र फलक काम पूर्ण झाल्याचे

2021-04-28 221 Dailymotion

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्‍यातील तळेगाव ठाकूर ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद नागरी सुविधा योजनेअंतर्गत तीन लाख रुपय निधी खर्च करून सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, हा रस्ता अपुराच बांधल्याने नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे डोब साचून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाले आहे. सहा हजार लोकसंख्या असलेले तळेगाव ठाकूर या गावात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 25 लाख रुपयांचे रस्ते बांधण्यात आले. मात्र, एकाच रस्त्यामध्ये काम अपुरे दाखवून काम पूर्ण झाल्याचे फलक लावून सदर कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी नागरिक करीत आहे. (व्हिडिओ : प्रशिक मकेश्वर)