कोरोनाचा कहर, लॉकडाऊनचे विविध टप्पे आणि त्यातील सर्व अडचणींवर मात करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोल्हापुरात शूटिंग सीझनलाच प्रारंभ होणार आहे. चित्रपटाबरोबरच मालिका, वेबसीरिज आणि कॉर्पोरेट जाहिराती अशा सर्वच माध्यमांतील शूटिंगला येथे सुरवात होईल. एकूणच बदललेले अर्थकारण, कमी झालेला रोजगार अशा सर्वच पार्श्वभूमीवर येथे घडत असलेली ही सकारात्मक स्थित्यंतरे म्हणजे रोजगाराच्या नव्या संधींची नांदी ठरणार आहे.
बातमीदार- संभाजी गंडमाळे
व्हिडिओ- बी. डी. चेचर