Surprise Me!

चंद्रकांत खैरेंसमोरच राज साहेब अंगार है....च्या घोषणा

2021-06-12 0 Dailymotion

औरंगाबाद : क्रांती चौकात शिवसेनेची तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा गाड्यांचा ताफा तेथून जात होता. वाटेत मनसेच्या स्टेज जवळ ताफा थांबला. तिथे माजी शिवसैनिक आणि आताचे मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या बाबत खैरे यांनी विचारणा केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलवून आणल्यानंतर खैरे दाशरथे यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना नमस्कार केला. याचवेळी मनसैनिकांनी राज साहेब अंगार है, बाकी सब भंगार है च्या घोषणा दिल्या. यानंतर मात्र ताफा सरसर निघून गेला.