शुक्रवारी, ईडीच्या पथकाने शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित कारखान्यावर कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने जालना जिल्ह्यातील सावरगाव हडप येथील रामनगर साखर कारखान्याची २०० एकर जमीन, कारखान्याची इमारत आणि यंत्रसामग्री जप्त केली. कारखान्यांच्या विक्रीच्या संदर्भात झालेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या करवाईवर अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.