शिवसेनेला मोठं खिंडार पाडून एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली. सरकार बनवलं. अजूनही ठाकरेंच्या शिवसैनिकांना शिंदे स्वत:च्या गटात ओढतायत. त्यातच भाजपही शिवसेनेला कायमच डिवचण्याचा प्रयत्न करतंय. पण आता राष्ट्रवादीचाच एक मोठी नेता भाजपमध्ये येण्यासाठी धडपडतोय, अशा चर्चा रंगल्यात. त्याला कारणही तसंच आहे, भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय. तोही जाहीर सभेत... ते म्हणालेत की, हा नेता सत्ता गेल्यामुळे तडफडतोय आणि भाजपमध्ये येण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतोय. रणजीतसिंह निंबाळकरांनी या नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी, त्यांचा रोख रामराजे निंबाळकरांकडे असल्याचं बोललं जातंय. रामराजे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आहेत. आणि त्यांचे जावईही भाजपात आहेत. ते नुकतेच विधानसभेचे अध्यक्षही झाले आहेत. त्यामुळे या चर्चांना चांगलाच जोर चढलाय. पाहा काय म्हणालेत रणजीतसिंह निंबाळकर...
#Sharapawar #NCP #Ramrajenimalkar #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat