Surprise Me!

पुणे मेट्रो ५५ किमी सुरू, २०० किमीचं लक्ष्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2026-03-15 0 Dailymotion

पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील पुणे मेट्रो भवनाचे उद्घाटन करताना त्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या प्रकल्पाचे काही टप्पे मे आणि जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सध्या पुण्यात सुमारे ५५ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू असून, आणखी ५५ किलोमीटर मार्गांचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात PMRDA क्षेत्रात एकूण २०० किलोमीटर मेट्रो नेटवर्क उभारण्याचा उद्देश आहे.

#PuneMetro #DevendraFadnavis #MaharashtraNews #AsianetNewsMarathi