Surprise Me!

भगतसिंग केवळ क्रांतिकारक नव्हे, तर प्रेरक विचार व वृत्ती - भगतसिंग यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंग

2026-03-20 5 Dailymotion

पुणे - "भगतसिंग हे केवळ देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकाचं नाव नाही; तर भगतसिंग हा एक विचार व वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, श्रमजीवींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा, संघर्ष करणारा विचार म्हणजे भगतसिंग आहे. त्यामुळं आज शरीररूपाने भगतसिंग नसले, तरी विचाररूपाने ते आजही प्रेरणादायी आहेत," असे प्रतिपादन भगतसिंग यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंग यांनी व्यक्त केलं. तसेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांना स्वातंत्र्य, न्याय हक्कांसाठी संघर्ष करावा लागतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

विचारवंत किरणजितसिंग पुण्यात आले असून, पुण्यातील माध्यमांशी बोलताना त्यांनी भगतसिंग व त्यांच्या कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी सरहद संस्थेचे संजय नहार, कृष्णा पब्लिकेशनचे संचालक चेतन कोळी, जीवनचरित्राच्या अनुवादक इंद्रायणी चव्हाण उपस्थित होत्या.