Surprise Me!

घराचं नाव ‘संविधान’, मुलाचं नावही ‘संविधान’! दहा वर्षांपासून संविधानाचा जागर, वडमारे कुटुंबाचा अनोखा उपक्रम

2026-04-15 6 Dailymotion

बीड : शहरातील कांताबाई योगाजी वडमारे यांचं कार्य आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्या आणि त्यांचं कुटुंब संविधानाचा जागर करण्याचं महत्त्वपूर्ण काम सातत्याने करत आहेत. दररोज सायंकाळी त्या घरात नियमितपणे संविधानाचं वाचन करतात आणि लहान मुलांसह नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतात. संविधानाचा प्रसार व्हावा, समाजात समता आणि न्यायाची भावना रुजावी, हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून वडमारे कुटुंब अथक प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांनी आपल्या घरालाच ‘संविधान’ असं नाव दिलंय. इतकंच नव्हं, तर वर्षभर घरावर आकर्षक रोषणाई करून संविधानाप्रती नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कुटुंबाची संविधानावरील निष्ठा एवढी गाढ आहे की, त्यांनी आपल्या मुलाचं नाव देखील ‘संविधान’ असं ठेवलं आहे. त्यांच्या या कृतीतून संविधानाविषयीचा आदर, एकात्मता आणि समतेचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो.