Surprise Me!

'निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2026-04-16 3 Dailymotion

पुणे - फूड एक सॉफ्ट पॉवर आहे. चायनीज, जपानी, फ्रेंच, कोरिअन खाद्य पदार्थांचा आस्वाद लोकं घेतात. भारताच्या प्रत्येक भागात वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. ही संस्कृती प्रत्येक 10 किलोमीटरवर बदलते. अनेक प्रकारचे चविष्ट व्यंजने आणि पदार्थ यात आहेत. या पारंपरिक पदार्थांना एखाद्या ब्रँडच्या रुपात जगात घेवून जायचे आणि त्यासाठी आवश्यक मानकांचे पालन करण्याचे काम चितळे बंधूनी केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखवला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या ‘चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

खाद्यपदार्थांचा दर्जा आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेली गॅलरी हे इथले वैशिष्ट्य आहे. या निरीक्षण गॅलरीमुळे उद्योगात पारदर्शकता येते आणि गुणवत्तेची तपासणीदेखील करता येते. इथून उत्पादनाच्या विविध टप्प्यातील प्रक्रीयेचे अवलोकन करता येते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि वितरकांनाही परदेशाप्रमाणे हा अनुभव व्हिजन पार्कमध्ये औद्योगिक सहलीच्या माध्यमातून घेता येईल. महाराष्ट्रीयन उद्योगाने अशा जागतिक मानकांचे पालन करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले.