छत्रपती संभाजीनगर : संसदेच्या विशेष अधिवेशनात शुक्रवारी महिला आरक्षण विधेयकसह घटनादुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या विधेयकांवर सखोल आणि वादळी चर्चा झाली. हे विधेयक पारित होण्याकरता झालेल्या मतदानात एकूण 582 सदस्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 298 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूंना तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. मात्र हे विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेलं दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्यानं ते मंजूर होऊ शकलं नाही. या संदर्भात महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "महिला विधेयकाला विरोध असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, तो पारित झाला नाही म्हणून आनंद व्यक्त करून हसणं हे महिलांचा अवमान करण्यासारखं आहे. महिलांच्या सन्मानासाठी सरकार काम करत असताना या विधेयकाला मंजुरी मिळणं अपेक्षित होतं, मात्र विरोधकांना त्यांची मत चालतात मात्र त्यांचा हक्क देण्यास विरोध करतात. या प्रकरणात कुठलेही राजकारण करणं चुकीचं ठरेल. मात्र काही अडचण असेल तर आधीच सरकारसोबत बोलायला हवं होतं.