पुणे - जागतिक स्थरावर जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील नागरिकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं. त्यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळण्याचं, परदेश प्रवास मर्यादित करण्याचं आणि पेट्रोलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनानंतर देशभर चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर सडकून टीका केली जात आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशातील आर्थिक परिस्थिती आणि आवाहनाला जर प्रतिसाद देण्यात आला तर कशी परिस्थिती असेल यावरून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर जोरदार टीका केली आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर यांच्याशी बातचीत केली आहे. पाहुया...