Surprise Me!

नसरापूर बलात्कार प्रकरण : भीमराव कांबळे दोषी; 'त्याला मरेपर्यंत फाशीच द्या', चित्रा वाघ आक्रमक

2026-06-26 4 Dailymotion

मुंबई : पुणे जिल्ह्यातील नरसापूर बलात्कार प्रकरणामध्ये भीमराव कांबळेला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. यामुळं भीमराव कांबळेला कोणती शिक्षा होणार? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राल पडला आहे. याविषयी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना भाजपा नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, "भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हायला हवी. पोक्सो केस अंतर्गत लवकर शिक्षा मिळालेलं हे पहिलंच प्रकरण आहे. अशा हरामखोरांना शिक्षा मिळायलाच हवी. याचबरोबर मालेगावमधील डोंगराळे गावातील चिमुकली देखील न्यायाची वाट बघत आहे. अहिल्यानगरमध्ये अशाच लहान मुलीवर ऍसिड फेकण्यात आलं. या सर्वांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी माझी आणि सर्वांचीच इच्छा आहे. पोलीस प्रशासन आणि गृह विभाग आपलं काम करत आहे. मात्र, आपण नागरिक म्हणून देखील सजग रहाण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला जर चुकीची घटना घडत असेल तर स्वतःहून संबंधित पीडितेला मदत केली पाहिजे.