Surprise Me!

केतन अग्रवालच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; पाहा व्हिडिओ

2026-06-27 0 Dailymotion

पिंपरी-चिंचवड: लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर केतन अग्रवालच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमधील लोढा बेल्मोनॉट सोसायटीतील रहिवाशांनी शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर कॅण्डल मार्च काढला. केतन अग्रवाल हा लोढा बेल्मोनॉट सोसायटीतील रहिवासी होता. त्याच्या अकाली आणि धक्कादायक मृत्यूमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हातात मेणबत्त्या आणि न्यायाच्या मागणीचे फलक घेऊन हजारो नागरिक या मार्चमध्ये सहभागी झाले होते. "केतनला न्याय मिळालाच पाहिजे", "आरोपींना कठोर शिक्षा द्या" अशा घोषणा देत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवालचा खून त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे समोर येत असल्यानं या प्रकरणाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.