Surprise Me!

सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सरकारला रोहित पवारांचा इशारा

2026-06-28 0 Dailymotion

बीड : जिल्ह्यात मागील दोन वर्षांत घडलेल्या खून प्रकरणांची पोलखोल आमदार रोहित पवार यांनी केली. जिल्ह्यात किती खून, किती अत्याचार झाले, हे जनतेसमोर आले पाहिजे आणि प्रत्येक पीडिताला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही टीका केली. "जोपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. दौरे आणि आंदोलने सुरू ठेवू. सरकारला सोडणार नाही नाही," असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला. पीकविमा योजनेबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. विविध नियम व अटी लावून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार विमा कंपन्यांच्याच हिताचे निर्णय घेत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली जात असल्याचेही त्यांनी म्हटलं. सरकारने शेतकऱ्यांची दयामाया करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. आता सरकार या मागणीची दखल घेणार का? तसेच येत्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार का? याकडं राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.