Amol Kolhe on Moshi Accident मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारत दुर्घटनेप्रकरणी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी गंभीर आरोप करत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार २५ मीटरपर्यंतच कचऱ्याचे ढिगारे करता येतात, मग ३० ते ३५ मीटर उंच कचऱ्याचे डोंगर कसे उभे राहिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बायोमायनिंग सुरू असतानाही एवढा कचरा का साचला, याचे स्वतंत्र ऑडिट करण्याचीही त्यांनी मागणी केली. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली.
#amolkolhe #moshi #LokmatPune #PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC