Surprise Me!

बेसा-पिंपळात लाईट पोल खरेदीवरून खळबळ: पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, मुख्याधिकाऱ्यांकडून नियमांचा दाखला!

2026-07-13 10 Dailymotion

बेसा-पिंपळा नगरपंचायतीच्या सुशोभीकरण प्रकल्पात ३.६४ कोटी खर्चून खरेदी केलेल्या सजावटीच्या लाईट पोलवरून वाद पेटला आहे. एका दुहेरी बाहू असलेल्या पोलसाठी १,६०,१५० रुपये मोजल्याने ही खरेदी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावरून स्थानिक नेत्यांनी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी सांगितले की, "शासनाच्या 'जेम' (GeM) पोर्टलवरून बजाज कंपनीचे पोल, फिटिंग, फाउंडेशन आणि केबलसह दर मागवले होते. त्यामध्ये आलेल्या दरानुसारच हे काम करण्यात आले आहे." आता या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
#Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral