खाकी वर्दी घालून नागरिकांची लूट केली, पोलिसांनी कसा शिकवला धडा? | Fake Police | Crime News
#FakePolice #PoliceAction #CrimeNews #MaharashtraPolice #BreakingNews #MarathiNews #CitizenSafety #PoliceInvestigation #Crime #Lokmat #LatestNews #Maharashtra #FakeCop #Robbery #trendingnews
खाकी पॅंट, कॅप, पोलिसांची वर्दी परिधान करुन हुबेहुब पोलीस बनले. सातारा पोलीस असल्याचं सांगत नागरिकांकडून हायवेवर नाकाबंदी केली. त्यांच्याकडून पैसे उकळले. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव वर्धनगड हायवेवर घडलेला हा प्रकार. 4 पुरुष, तीन महिला नकली पोलीस बनून हायवेवर खूली लूट करत होते. पुसेगाव पोलिसांना ही माहिती मिळताच या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला.
वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ खाकी वर्दी आणि बॅरेकेडचा वापर करून ही टोळी वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली कारवाईची भीती दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळत होती. गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी छापा टाकला आणि सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
आरोपींकडून दोन चारचाकी वाहने,आठ अँड्रॉईड मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
पोलिसांनी यासंदर्भात काय माहिती दिली तेही ऐका..