Surprise Me!

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष; 'पेपरफुटी झांकी है, ईव्हीएम अभी बाकी है'च्या दिल्या घोषणा

2026-07-25 1 Dailymotion

पुणे : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा (Dharmendra Pradhan Resign) द्यावा, या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं देशभर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यातील गुडलक चौक येथे विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला. तसंच "पेपरफुटी झांकी है, ईव्हीएम अभी बाकी है" अशी घोषणाबाजी केली. या जल्लोषात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.