Surprise Me!

खोपोलीत मुसळधार पाऊस! झेनिथ धबधबा परिसरात अचानक पूर आल्यानं 10 ते 12 पर्यटक अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

2026-07-28 12 Dailymotion

रायगड : जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात मंगळवारी (दि.28) दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळं नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. यामुळं धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेले सुमारे 10 ते 12 पर्यटक पाण्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र, नदीतील पाण्याचा वेग आणि प्रवाह मोठा असल्यामुळं बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळं पाणी ओसरण्याची प्रतीक्षा केली जात आहे. बचाव पथकानं पर्यटकांनी कोणताही धोका पत्करू नये, असं म्हटलय. तसंच सुरक्षित ठिकाणीच थांबून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारपासून खोपोली परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे.