Surprise Me!

'युवा पिढीच देशाचं भविष्य'; शिर्डीत साई दर्शनानंतर सोनू सूद यांची प्रतिक्रिया

2026-07-29 2 Dailymotion

शिर्डी : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त (Guru Purnima 2026) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. साईदर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना सोनू सूद म्हणाले, "युवा पिढी हीच आपल्या देशाचं भविष्य आहे. आपण सर्वांनी त्यांच्या भावना आणि विचार ऐकून घेतले पाहिजेत तसेच त्यांना पूर्ण साथ दिली पाहिजे." कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, काहीवेळा अशा आंदोलनांमध्ये काही घटक घुसून मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं अशा प्रवृत्तींपासून सावध राहून तरुणांनी आपले विचार प्रामाणिकपणे मांडले पाहिजेत. तसंच सरकारही देशाच्या भल्यासाठीच काम करत असून जनता आणि सरकार यांच्यात योग्य संवाद आणि विश्वासाचं नातं निर्माण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.