जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या तरुणांसाठी प्रवेश शुल्क दीडशेवरून थेट सहाशे रुपये केल्याने तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला. संतप्त तरुणांनी जी. एम. फाउंडेशनच्या समोर ठिय्या मांडत मंत्री गिरीश महाजनांना घेराव घातला. यावेळी महाजन संतप्त झाले होते. त्यांनी तरुणांना कार्यालयात बोलावून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
#girishmahajan #MarathiNews #MarathiBatmya #Maharashtranews #Maharashtrapolitics #Lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment