शिवसेनेच्या सत्ता संघर्षाचा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात सध्या ठाकरे गटातर्फे जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे तर पुढच्या सुनावणी कदाचित शिंदे गटातर्फे युक्तिवाद होण्याची शक्यता आहे पण यादरम्यान एकनाथ शिंदे यांना घेरण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ठाकरेंच्या फुटीर खासदारांसह भेट घेतली श. या भेटीवरूनच आता उद्धव ठाकरे यांनी मोठा आक्षेप घेतलाय आणि थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
#eknathshinde #uddhavthackeray #shivsenacrisis #shivsena #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment