Surprise Me!

महाल परिसरात कौटुंबिक वादातून भरदिवसा घडला गंभीर प्रकार! Nagpur Attack on Men in daylight

2026-08-10 27 Dailymotion

Nagpur Attack on Men in daylight नागपूरच्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील महाल परिसरातील नवाब पुरा भागात एका व्यक्तीवर भरदिवसा चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ​मिळालेल्या माहितीनुसार, आकाश गुलाबराव ढोमने असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर गणेश वानखेडे असे या हल्लेखोराचे नाव आहे. कौटुंबिक कलह आणि त्रिकोणी प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरोपी गणेशची पत्नी त्याला सोडून आकाश ढोमने याच्यासोबत राहत होती. याच जुन्या वादातून आणि मुलाच्या संदर्भातील कुरबुरीमुळे संतापलेल्या गणेशने महाल परिसतात आकाशवर धारदार शस्त्राने अचानक सपासप वार केले.

#crimenews #Nagpur #marathinews #maharashtranews