Surprise Me!

भरपावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन.. झेडपी शाळेच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आमरण उपोषण Igatpuri Student

2026-08-14 0 Dailymotion

Igatpuri Student Protest इगतपुरी तालुक्यातील पारदेवी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शाळेच्या जीर्ण इमारतीला पडलेल्या मोठ्या भेगा, पावसाळ्यात गळणारे छत, अस्वच्छ स्वच्छतागृह आणि गेल्या दहा दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शाळेतील विद्यार्थीही आंदोलनस्थळी सहभागी झाले. हातात तिरंगा आणि विविध मागण्यांचे फलक घेत विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

#igatpuri #studentsprotest #marathinews #maharashtranews