महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी विजय राठोड, पोलिस अधीक्षक निलोत्पल, महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी डॉ. जास्मिन, महापालिकेच्या महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
#independenceday2026 #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather