स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते २०० फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण झाले. या विशेष कार्यक्रमात त्यांनी ‘जेन-झी’ आणि तरुणांना मार्गदर्शन केले. भारताने इतर देशांशी तुलना न करता स्वतःच्या संस्कृतीनुसार विकासाची दिशा ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित तरुण आणि विद्यार्थिनींनी सरसंघचालकांच्या मार्गदर्शनावर अत्यंत सकारात्मक व उत्साही प्रतिक्रिया दिल्या. या प्रेरणादायी संवादातून देशसेवेची नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगत तरुणांनी राष्ट्रउभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
#mohanbhagwat #nagpurnews #independenceday