Maharashtra Weather Updates विदर्भातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवली असून, पावसाची तूट कायम असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी सांगितले आहे. १ जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत विदर्भात सरासरीच्या तुलनेत १८ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे, तर नागपुरात ही तूट २५ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे, पुढील ३ ते ५ दिवस विदर्भात हवामान कोरडे राहणार असून तापमानात ३ ते ४ अंशांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
#Maharashtra #WeatherUpdates #maharashtraweather