गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊन काम करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला
आहे. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वातील सर्व खासदारांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावरून शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.या सगळ्या घडामोंडीमध्ये बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अजित पवार गटाचे नेते खासदार पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास रात्री ११ वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. या भेटीचे कारण अधिकृतपणे स्पष्ट झालं नसलं, तरी या बैठकीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चांना बळ मिळाल्याचे सांगितले जातंय. तीन तास शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये राज्यातील राजकीत परिस्थिती आणि विकास प्रकल्पांवर चर्चा झाल्याचं बोललं जातंय.
मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीचं विलिनीकरण यावर तीन तासांच्या या भेटील चर्चा झाली असल्याचा अंदाज आता बांधला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादी गोटात मोठ्या घडामोडी सुरु असताना आजोबा आणि नातवाची ही भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जातेय.
#parthpawar #sharadpawar #sunetrapawar #ncp #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics