Surprise Me!

Uday Samant : शेतकऱ्यांना कर्जमाफी, 75 हजार नोकऱ्या! महाराष्ट्राच्या बजेटमधील मोठ्या घोषणा

2026-03-06 0 Dailymotion

मंत्री Uday Samant यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा स्पष्ट केल्या.

२५ सप्टेंबर २०२० पर्यंत २ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनही देण्यात येणार आहे.

कोकणातील विकासाला गती देण्यासाठी सिंधुरत्न प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक मजबूत करण्यात आली आहे.

याशिवाय लघु व मध्यम उद्योगांसाठी प्रोत्साहन, छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी निधी आणि ७५ हजार सरकारी नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामीण भागात मजबूत काँक्रीट रस्ते उभारून ग्रामीण विकासाला चालना देण्यावरही भर देण्यात आला आहे.

#UdaySamant #MaharashtraBudget #politics #asianetnewsmarathi