Surprise Me!

भाजपा महिला आघाडीचं पुण्याक काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडिओ

2026-04-24 3 Dailymotion

पुणे - संसदेत नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर देशभरात सत्ताधारी भाजपाकडून विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा महिला आघाडीच्या वतीनं पुण्यातील बालगंधर्व चौक येथे काँग्रेसविरोधात आंदोलन करत नारीशक्ती विधेयक मंजूर करण्यात यावं आणि महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

पुण्यातील बालगंधर्व चौक येथे शुक्रवारी भाजपा महिला आघाडीच्या वतीनं नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्याबाबत विरोधकांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी आंदोलक महिला म्हणाल्या की, काँग्रेस महिलांविरोधात असून, जोपर्यंत नारीशक्ती विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच सुरू ठेवणार आहोत. आमची मागणी आहे की, महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे आणि या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत.