शिर्डी - ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज शिर्डी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या सावंत यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर भाष्य करताना एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता निशाणा साधला. टायगर ऑपरेशन करण्यासाठी टायगरला दात असावे लागतात. हा टायगर लाचार असून त्याचा दररोज अपमान केला जातो अशी टीका त्यांनी केली. यावेळी सावंत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही भाजपावर हल्लाबोल केला. राम मंदिरासाठी शिवसेनेने बलिदान दिलं, योगदान दिलं. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा हे लोक शेपूट घालून पळाले होते. आज मात्र रामाच्या नावाचा बाजार मांडला जात आहे. जय श्रीराम म्हणायचं आणि वागायचं मात्र रावणासारखं अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.