Surprise Me!

पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मोठा उत्साह! एस. पी. महाविद्यालयात सामूहिक योगासन करत दिला 'फिट इंडिया'चा संदेश

2026-06-21 0 Dailymotion

पुणे : रविवारी देशभरात मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय. देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुण्यात देखील पुण्यातील स. प. महाविद्यालय इथं आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित 'आंतरराष्ट्रीय योग दिन' कार्यक्रमात सामूहिक योग सत्र आयोजित करून योगाचे महत्त्व सांगण्यात आले. पुणे शहर व जिल्ह्यातील नागरिक, शाळकरी मुले तसंच नगरसेवक, अधिकारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सेवाभावी शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुले, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना, युवक मंडळे, महिला मंडळे तसंच क्रीडा क्षेत्रात कार्यरत संस्थांनी अधिकाधिक लोकसहभागासह 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करत सामूहिक योग प्रात्यक्षिकाद्वारे फिट इंडियाचा संदेश यावेळी देण्यात आला.