छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके शहरात दाखल झाले. त्यावेळीपासून अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोज अनेक विद्यार्थी, सामान्य व्यक्ती त्यांच्या भेटीला येतात. यावेळी ते अभिजीत दिपके यांना फुलं देऊन त्यांचं कौतुक करत आहेत. युवक त्यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. मात्र अभिजीत दिपके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला आहे. असं असूनही तमा न बाळगता बुधवारी (दि.5) भेटण्यासाठी आलेल्या लोकांना आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अभिजीत स्वतः चहा देत आहेत. त्यांच्या घरी संघटनेची बैठक आयोजित केली आहे. दरम्यानच्या काळात भेटण्यासाठी आलेल्या लोकांना ते भेट देत असताना त्यांनी सर्वांसाठी चहा मागवत स्वतः वाटप केला.