Online Fraud ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बनावट बँक खात्यांचा ('म्युल अकाउंट्स') गोरखधंदा चालवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फसवणुकीचा काळा पैसा पांढरा (मनी लॉन्ड्रिंग) करण्यासाठी सुरू असलेल्या या काळ्या कारभाराविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चक्क २०७ एटीएम कार्डे, ४५ सिम कार्ड आणि ५० बँक पासबुक जप्त केल्याने संपूर्ण पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
#nagpur #cybercrime #crimenews #nagpur #lokmatnagpur #onlinefraud