गडचिरोलीतील एका आदिवासी आश्रमशाळेत झोपलेल्या विद्यार्थिनींना मण्यार जातीच्या सापाने दंश केल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या आणि संस्थाचालकांच्या ढिसाळ कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकी काय घडली ही घटना आणि कशामुळे ओढवला हा अनर्थ, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर... नमस्कार, मी क्षितिजा देशमुख, तुम्ही बघत आहात लोकमत डॉट कॉम.