Surprise Me!

बस नाही, शिकायचं कसं? व्हायरल झालेली टीनाची पोस्ट प्रशासनाने थेट गावात येऊन सुरू केली बससेवा!

2026-08-14 6 Dailymotion

होय, तिने सोशल मीडियावरूनच आपली समस्या मांडली होती! नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील खेतापूर हे दुर्गम गाव. येथील इयत्ता नववीत शिकणारी टीना वैकुंठे ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी ७ किलोमीटर लांब असलेल्या डोंगरगाव येथे जाते. मात्र, हक्काची एसटी बस नसल्याने तिला व इतर मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने जिद्द करत आपली ही व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवली.
​या चिमुकलीच्या सोशल मीडियावरील हाकेची नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली. ते थेट कुणाच्याही प्रतीक्षेशिवाय खेतापूर गावात पोहोचले आणि टीनासह सर्व मैत्रिणींशी संवाद साधला. विशेष म्हणजे, भेटीदरम्यानच राज्य परिवहन महामंडळाला आदेश देत त्यांनी खेतापूर ते नागपूर बससेवेचा टीना आणि तिच्या मैत्रिणींच्या हस्ते दणक्यात शुभारंभ केला.
​याशिवाय रस्ता दुरुस्ती, पाळीव जनावरांवरील वाघांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाचे नियोजन आणि इतर समस्यांवरही तत्काळ तोढागा काढत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची एक वेगळीच संवेदनशीलता दाखवली. एका शाळकरी मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेल्या पुढाकाराची आणि जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेची ही घटना सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.