Nagpur Cyber Racket Exposed: शहरात संघटित सायबर फसवणूक आणि हॅकिंग रॅकेट सक्रिय असल्याचा संशय घेत दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी पोलीस आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. वर्धमान नगर, खामला व जरीपटका भागातील अशिक्षित व दुर्बल नागरिकांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बनावट बँक खाती उघडल्याचा आरोप आहे. या खात्यांचा वापर मनी लाँड्रिंग, हवाला, ऑनलाइन गेमिंग व देशविघातक कारवायांसाठी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली व राजस्थानमधील गुन्हेगारांशी संभाव्य संबंध पाहता, आर्थिक गुन्हे शाखा आणि केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
#nagpur #crimenews #cyberracket #cyberfraud #digitalarrestscam