Surprise Me!

Nagpur मधील डागा रुग्णालयातून नवजात बाळ भरदिवसा चोरीला; रात्री पोलिसांनी सुरक्षितरित्या शोधून काढले

2026-08-22 10 Dailymotion

नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सरकारी योजना आणि पाच हजारांच्या किटचे आमिष दाखवून, बुरखा घातलेल्या एका अनोळखी महिलेने अवघ्या काही तासांच्या नवजात मुलीला भरदिवसा पळवून नेले. गोळीबार चौक परिसरातील प्रभा शक्ती पाठराबे यांची गुरुवारी मध्यरात्री डागा रुग्णालयात सामान्य प्रसूती झाली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजता एक बुरखाधारी महिला वॉर्डमध्ये आली. तिने विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सांगत आजीची नजर चुकवून बाळाला लांब नेले आणि बाळ घेऊन पसार झाली. बाळ चोरीला गेल्याचे उघडकीस येताच रुग्णालयात मोठी खळबळ उडाली आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रात्री यशोधरानगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून नवजात बाळाला सुखरूप आपल्या ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

#nagpurnews #dagahospital #nagpur #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics